आता भारतात तयार होणार राफेल; डसॉल्ट आणि टाटा समूहाचा करार

भारतात लवकरच राफेल लढाऊ विमाने बनवली जाणार आहेत. राफेल विमान बनवणारी कंपनी ‘डसॉल्ट एव्हिएशन’ आणि ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड’ने भारतात या विमानाचा मुख्य भाग तयार करण्याबाबत करार केला आहे.
आता भारतात तयार होणार राफेल; डसॉल्ट आणि टाटा समूहाचा करार
Published on

नवी दिल्ली : भारतात लवकरच राफेल लढाऊ विमाने बनवली जाणार आहेत. राफेल विमान बनवणारी कंपनी ‘डसॉल्ट एव्हिएशन’ आणि ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड’ने भारतात या विमानाचा मुख्य भाग तयार करण्याबाबत करार केला आहे. हा करार देशाच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल.

हा करार भारताच्या एरोस्पेस पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल. हे पाऊल भारतातील धोरणात्मक आणि लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या करारांतर्गत राफेल लढाऊ विमानाचे महत्त्वाचे भाग तयार केले जाणार आहेत. यामध्ये विमानाचा फ्यूजलेज, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि विमानाच्या पुढच्या भागाचा समावेश आहे. राफेलचा पहिला फ्यूजलेज २०२८ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. कारखाना पूर्णपणे तयार झाल्यावर दर महिन्याला येथून २ फ्यूजलेज तयार केले जातील.‘डसॉल्ट एव्हिएशन’चे अध्यक्ष आणि सीईओ म्हणाले, राफेलचा फ्यूजलेज पहिल्यांदाच फ्रान्सबाहेर तयार केला जाईल. भारतातील आमची पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे.

भारताच्या एअरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल

‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड’चे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंग म्हणाले, ही भागीदारी भारताच्या एअरोस्पेस प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. संपूर्ण राफेल फ्यूजलेजचे भारतात उत्पादन टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सच्या क्षमतेवरील वाढता विश्वास आणि डसॉल्ट एव्हिएशनसोबतच्या आमच्या सहकार्याच्या ताकदीला अधोरेखित करते.

logo
marathi.freepressjournal.in