राघव चढ्ढा यांच्या नावासमोर ‘शिफ्टेड’ शेरा; AAP सरकारवर सूडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप

पंजाबमधील आगामी मतदार यादीच्या मसुद्यात आपले नाव 'शिफ्टेड' (स्थान बदललेले) म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
राघव चढ्ढा यांच्या नावासमोर ‘शिफ्टेड’ शेरा; AAP सरकारवर सूडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप
राघव चढ्ढा यांच्या नावासमोर ‘शिफ्टेड’ शेरा; AAP सरकारवर सूडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप संग्रहित छायाचित्र
Published on

चंदीगड / नवी दिल्ली :

पंजाबमधील आगामी मतदार यादीच्या मसुद्यात आपले नाव 'शिफ्टेड' (स्थान बदललेले) म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. आपले मतदार ओळखपत्र मोहालीचे असतानाही, आम आदमी पक्षाच्या (आप) पंजाब सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा दावा पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी केला आहे.

दुसरीकडे, 'आप'ने या आरोपांचा समाचार घेत, चढा हे दिल्लीतून "मागच्या तारखेची (बॅकडेटेड) प्रक्रिया" करून आपले नाव दिल्लीच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत होते, आणि आता पंजाब सरकारवर खापर फोडत आहेत, असा पलटवार केला.

तथापि, निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चढा यांच्या नावाबाबत असा कोणताही मागच्या दाराने प्रयत्न सुरू असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. असा कोणताही प्रयत्न झालेला नाही, असे स्पष्ट करत अधिकाऱ्याने सांगितले की, 'विशेष तीव्र पुनरीक्षण' प्रक्रियेअंतर्गत चढ्ढा यांचे नाव मसुदा यादीत 'शिफ्टेड' श्रेणीत टाकण्यात आले आहे.

सूडाचे राजकारण

चढा यांनी सोशल मीडिया व्यासपीठ एक्सवर पोस्ट करत म्हटले, पंजाबमधील 'आप' सरकारने आता सूडबुद्धीचे राजकारण मतदार यादीच्या मसुद्यापर्यंत आणले आहे. मी पंजाबमधून राज्यसभा खासदार आहे आणि माझे मतदार ओळखपत्र मोहालीत नोंदणीकृत आहे. तरीही मतदार यादीच्या मसुद्यात माझे नाव 'शिफ्टेड' म्हणून दाखवण्यात आले आहे. ही केवळ लिपिकीय चूक वाटत नाही, तर हा उघड राजकीय सूड उगवण्याचा प्रकार आहे.

हा केवळ मसुदा

चढा यांनी स्पष्ट केले की, सुदैवाने ही अंतिम मतदार यादी नसून केवळ मसुदा आहे. हरकती आणि सूचनांच्या काळात नावे दुरुस्त केली जातात. अंतिम यादी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होईल आणि मी एसआयआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य त्या कायदेशीर उपाययोजना करत आहे. आपला हेतूपुरस्सर लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप चढा यांनी केला. एप्रिल महिन्यात 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे नेतृत्व आपल्यावर राग धरून आहे आणि प्रशासनाचा वापर करून विरोधकांना त्रास दिला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in