त्यांची झोप उडाली आहे; राहुल गांधी यांची मोदी, शहा, ज्ञानेश यांच्यावर टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोव्यात मडगाव येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली.
त्यांची झोप उडाली आहे; राहुल गांधी यांची मोदी, शहा, ज्ञानेश यांच्यावर टीका
त्यांची झोप उडाली आहे; राहुल गांधी यांची मोदी, शहा, ज्ञानेश यांच्यावर टीका(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

पणजी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोव्यात मडगाव येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली. ‘देशात मत चोरण्याचे षडयंत्र रचले जात असून, या तिघांनाही आता रात्री शांत झोप येत नाही’, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, ‘मी प्रत्येक राज्यात जाऊन सांगतोय की, पंतप्रधान मतांची चोरी करतात. पण माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही, कारण त्यांना माहीत आहे की गुन्हा दाखल झाल्यास तो कायदेशीर होईल आणि ते त्यात अडकतील. दिल्लीत ज्ञानेश कुमार यांना रात्री झोप लागत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाही झोप लागत नाही, कारण त्यांना माहीत आहे की जनता आज ना उद्या त्यांच्याकडून न्यायाची मागणी करेल.

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही देशाच्या संविधानाचे रक्षक आहोत. संविधानाचे संरक्षण करणे हे आमचे पवित्र कर्तव्य आहे. परंतु, मतचोरी करून थेट संविधानावर आणि आमच्या कर्तव्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता हे कधीही सहन करणार नाही. निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांमधील संबंधांवर बोट ठेवताना राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले. ते म्हणाले, ‘ज्ञानेश कुमार मतचोरीची योजना अमलात आणतात, अमित शाह ती चालवतात आणि पडद्यामागून या संपूर्ण खेळाची सूत्रे नरेंद्र मोदी हलवतात’.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in