बाईक रॅलीदरम्यान कार्यकर्त्याने राहुल गांधींना केले किस

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ सुरू आहे. यावेळी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीदरम्यान एका व्यक्तीने अचानक राहुल गांधींच्या बाईकजवळ जाऊन राहुल गांधी यांना मिठी मारली आणि गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
बाईक रॅलीदरम्यान कार्यकर्त्याने राहुल गांधींना केले किस
Photo : X (@mohitlaws)
Published on

पाटणा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ सुरू आहे. यावेळी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीदरम्यान एका व्यक्तीने अचानक राहुल गांधींच्या बाईकजवळ जाऊन राहुल गांधी यांना मिठी मारली आणि गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लगेच सुरक्षा रक्षकाने त्या व्यक्तीला तत्काळ बाजूला ओढले आणि जोरात कानशिलात लगावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारच्या विविध शहरात जात सभा आणि मेळावे घेत आहेत. रविवारी बिहारच्या पूर्णिया-अरारिया मार्गावर व्होटर अधिकार यात्रेत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व राहुल गांधी करत होते. यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक झाल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in