'खिसेकापूंपासून सावधान' राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवरून आणि त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'खिसेकापूंपासून सावधान' राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा
'खिसेकापूंपासून सावधान' राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवरून आणि त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हा शिक्षणाकडे सेवा म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून पाहिले जाते, तेव्हा चुका सुधारल्या जात नाहीत, तर त्या आणखी वाढतात, असा टोला त्यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर हिंदीत पोस्ट करत म्हटले की, "खिसेकापूंपासून सावधान राहा- आज ते थेट सीबीएसईच्या आत बसले आहेत. जर सीबीएसईच्या चुकीमुळे तुमचे गुण कमी झाले, तर तुम्हाला काय मिळते, एक भलेमोठे बिल! डिजिटल स्कॅन कॉपीसाठी प्रति विषय १०० रुपये, गुणमोजणीसाठी प्रति पेपर १०० रुपये आणि पुनर्मूल्यांकनासाठी प्रति प्रश्न २५ रुपये!

"स्वतःच्या उत्तरपत्रिकेचे अचूक मूल्यमापन व्हावे, यासाठी एका विद्यार्थ्याला तब्बल २,००० रुपयांपर्यंतचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. जेव्हा ४ लाख विद्यार्थ्यांनी असे अर्ज केले असतील, तेव्हा सीबीएसईने यातून किती महसूल गोळा केला असेल, याचा विचार करा., असे राहुल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in