यूपीआय शुल्क मागे घेण्याची काँग्रेसची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा निर्णय घेतला असून, भारताचा मोठा पैसा अमेरिकेला दिला जात आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.
यूपीआय शुल्क मागे घेण्याची काँग्रेसची मागणी
यूपीआय शुल्क मागे घेण्याची काँग्रेसची मागणी
Published on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा निर्णय घेतला असून, भारताचा मोठा पैसा अमेरिकेला दिला जात आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. यासोबतच सरकारने युपीआय व्यवहारांवर लादलेले नवे शुल्क तत्काळ मागे घ्यावे अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसमोर झुकणे थांबवावे, स्वाभिमान दाखवावा आणि हा 'यूपीआय कर' त्वरित रद्द करावा."

राहुल गांधींनी आपल्या व्हिडिओत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, "इंदिराजींना एकदा विचारण्यात आले होते की त्या डाव्या विचारसरणीच्या आहेत की उजव्या, त्यावर त्या म्हणाल्या होत्या, 'मी डावीकडे झुकत नाही, उजवीकडेही झुकत नाही; मी थेट सरळ उभी राहते.'

परंतु, मोदींची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. ते डावीकडे किंवा उजवीकडे न झुकता, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर साष्टांग प्रणिपात करत आहेत. ते पुढे म्हणाले, "मोदींनी युपीआयवर कर लावून प्रत्येक भारतीय नागरिकावर आर्थिक बोजा टाकला आहे आणि हा सर्व पैसा अमेरिकेला दिला जात आहे."

नोटाची नवी व्याख्या

काँग्रेस पक्षाने सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की, अमेरिकेच्या दबावाखाली येऊन सरकारने 'झीरो एमडीआर' धोरण रद्द केले आहे. पंतप्रधानांनी केलेली नोटाची नवी व्याख्या, "नरेट्स ऑनगोइंग ट्रम्प अपीझमेंट" (नुकतेच ट्रम्प यांचे चाललेले लांगूलचालन) अशी आहे, असा टोलाही काँग्रेसने लगावला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in