...तोपर्यंत झोपू देणार नाही - राहुल गांधी

मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही सरकारवर दबाव कायम ठेवू आणि त्यांना झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.
...तोपर्यंत झोपू देणार नाही - राहुल गांधी
Published on

मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही सरकारवर दबाव कायम ठेवू आणि त्यांना झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. ही लढाई हिंसा किंवा द्वेषाने नव्हे, तर प्रेमाने आणि अहिंसेच्या मार्गाने लढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, स्वतःला चाणक्य आणि सरदार पटेल म्हणवणारे गृहमंत्री आज कुठे गायब झाले आहेत, ते जवळजवळ २० दिवस संसदेत येऊ शकले नाहीत, कारण पहिल्यांदाच त्यांना देशाच्या अभिव्यक्तीची खरी ताकद जाणवली आहे.

भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. "भाजप-आरएसएस म्हणजे भारताची कोणतीही समज नसलेला 'जोकरांची टोळी' आहे," अशी टीका त्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण हे फक्त जागतिक नेत्यांना "मिठी मारण्यापुरतेच" मर्यादित आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीत आयोजित 'रचनात्मक काँग्रेस'च्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी बोलत होते.

मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "परराष्ट्र धोरण म्हणजे केवळ नेत्यांना मिठी मारणे, ही कल्पना पंतप्रधानांच्या मनात कशी रुजली हे अनाकलनीय आहे. ही टीका स्पष्ट करण्यासाठी राहुल गांधी यांनी मंचावर उपस्थित रचनात्मक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांना मिठी मारून दाखवत सध्याच्या सरकारचे परराष्ट्र धोरण कसे चालते, याचे प्रात्यक्षिक दिले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in