राहुल गांधींची पाककला! मिठाईच्या दुकानात जाऊन बनविली इमरती अन् बेसन लाडू

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी जुन्या दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात पोहोचले आणि तेथे त्यांनी इमरती आणि बेसनचे लाडू बनवले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
राहुल गांधींची पाककला! मिठाईच्या दुकानात जाऊन बनविली इमरती अन् बेसन लाडू
Published on

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी जुन्या दिल्लीतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात पोहोचले आणि तेथे त्यांनी इमरती आणि बेसनचे लाडू बनवले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राहुल गांधी कधी दिल्लीच्या प्रसिद्ध चाटच्या दुकानात स्वाद घेताना तर कधी लंडनच्या प्रसिद्ध कॅफेत कॉफी घेताना दिसतात. त्यांची खवय्येगिरी सर्वांनाच परिचित आहे. सध्या देशभरात दिवाळीचा सण सुरु आहे. अशातच राहुल गांधी दिवाळीनिमित्त ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानावर पोहोचले. यावेळी त्यांनी स्वत: मिठाई आणि बेसनचे लाडू बनवण्याचा अनुभव घेतला. राहुल हे एका कढईत काविलता फिरवून मिठाई बनवताना दिसत आहेत तर त्यांनी जिलेबीही काढली, असे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

बेसन लाडू

हा व्हिडीओ सोशल मीडिया साईट ‘एक्स’वर राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिले की, दिल्लीचे प्रसिद्ध घंटेवाला मिठाईवाले दुकानावर बेसनचे लाडू बनवले. जुन्या असलेल्या या प्रसिद्ध दुकानाची चव आजही तशीच आहे. तोच पारंपारिकपणा आणि जीभेवर रेंगाळणारी चव आहे. दीपावलीचा खरा गोडवा थाळीत नव्हे तर नात्यांमध्ये आणि समाजामध्ये आहे. त्यांनी पुढे लोकांना विचारले की, तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करता आणि कशी खास बनवता.

logo
marathi.freepressjournal.in