
मोदी आडनाव मानहानी प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे लोकसभा सचिवालायकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेण्यात आली होती. यानंतर राहुल यांना त्यांचं सरकारी घर देखील सोडावं लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेवर काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर राहुल यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या खादारकी परत मिळाल्यानंतर आज सरकारी निवास्थानही देण्यात आलं आहे. त्यामुळे राहुल गांधी हे पुन्हा पुर्वी राहत असलेल्या '१२ तुघलक लेन' या निवास्थानी पुन्हा वास्तव्यास येणार आहेत. राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. यांतर सरकारी निवास्थान देखील परत देण्यात आलं. यावेळी राहुल यांनी माध्यमांना प्रक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "संपूर्ण भारतच माझं घर आहे."
काय आहे प्रकरण?
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात प्रचार करत असताना सभेदरम्यान मोदी आडनावावरुन टीका करताना त्यांनी देशाला चुना लावून फरार झालेले नीरव मोदी, ललील मोदी यांचा उल्लेख केला. तसंच त्यांनी यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. मात्र, हे विधान त्यांना चांगलंच महागात पडल. याविरोधात गुजरात येथील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी गुजरातच्या स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली. होती.
राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देत त्यांना बदनामी फौजदारी प्रकरणात दोषी ठरवत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. तसंच त्यांच्याकडून त्यांच घर देखील काढून घेण्यात आलं होतं.