ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार निशाणा साधला. "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जातील आणि हे मोदी सरकारही जाईल. त्यानंतरच लोकशाहीची खरी दुरुस्ती सुरू होईल," असा दावा राहुल गांधींनी केला आहे.
 राहुल गांधी
राहुल गांधी(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार निशाणा साधला. "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जातील आणि हे मोदी सरकारही जाईल. त्यानंतरच लोकशाहीची खरी दुरुस्ती सुरू होईल," असा दावा राहुल गांधींनी केला आहे. तर भारत आता मोदी आणि शहांच्या हातातील हुकूमशाही देश बनला आहे, असा हल्ला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी चढविला.

राहुल गांधी यांनी म्हटले की, "ज्ञानेश कुमार जाएंगे। यह सरकार जाएगी। फिर लोकतंत्र की मरम्मत शुरू होगी।" या पोस्टसोबत त्यांनी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 'इंडिया' आघाडीच्या खासदारांसमोर केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

दरम्यान, प्रियांका यांनी शनिवारी असा आरोप केला की, भारत आता 'लोकशाही' देश राहिलेला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे चालवली जाणारी 'हुकूमशाही' बनला आहे, लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी जे लोक त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, ते देशद्रोह करत आहेत. पहिले त्यांनी २५४ खासदारांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांवर अतिक्रमण करत त्यांना पूर्णपणे बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले.

logo
marathi.freepressjournal.in