खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेत; संजय राऊतांशी केली 'या' मुद्द्यावर चर्चा

आज राहुल गांधी हे संसदेत दाखल झाले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधला
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेत; संजय राऊतांशी केली 'या' मुद्द्यावर चर्चा
@ANI

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आज ते पहिल्यांदा संसदेत गेले होते. यावेळी त्यांनी सीपीपी कार्यालयामध्ये काँग्रेसच्या लोकसभा तसेच राज्यसभा खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीदेखील भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधीदेखील होत्या.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली की, "सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी." अशी माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरणाचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा दिला होता. यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खलबते पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेस आणि राहुल गांधी हे वीर सावरकरांवर कोणतेही विधान करणार नसल्याचे दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर आजची खासदार संजय राऊतांसोबत झालेली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची संसदेतील भेट महत्त्वाची ठरते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in