निवडणुकांमध्ये ‘फिक्सिंग’! राहुल गांधी, खर्गेंचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल; रस्त्यावर, संसदेतही संघर्ष करणार, काँग्रेसचा निर्धार

देशात ‘ईव्हीएम’ आणि मतदार याद्यांमध्ये निवडणुकीची ‘मॅच फिक्सिंग’ सुरू असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणुकांमध्ये ‘फिक्सिंग’! राहुल गांधी, खर्गे यांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल; रस्त्यावर, संसदेतही संघर्ष सुरूच ठेवणार, काँग्रेसचा निर्धार
निवडणुकांमध्ये ‘फिक्सिंग’! राहुल गांधी, खर्गे यांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल; रस्त्यावर, संसदेतही संघर्ष सुरूच ठेवणार, काँग्रेसचा निर्धार(Photo-X)
Published on: 

नवी दिल्ली : देशात ‘ईव्हीएम’ आणि मतदार याद्यांमध्ये निवडणुकीची ‘मॅच फिक्सिंग’ सुरू असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकारिणी कमिटीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत ‘विरोध’ आणि ‘प्रतिकार’ (रेझिस्टन्स) या मार्गापासून मागे हटता कामा नये आणि हा लढा रस्त्यावर उतरून संसदेपर्यंत तीव्र केला पाहिजे.

इंदिरा भवन येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सुमारे अडीच तासांच्या या बैठकीत राहुल गांधी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष सातत्याने ‘मतचोरी’चा मुद्दा लावून धरत आहे. याआधी हरयाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमधील गैरप्रकारांवर काँग्रेसने आवाज उठवला होता, तेव्हा अनेकांना त्यावर शंका होती. मात्र, आता हा विषय मीडिया आणि संपादकीय लेखांमध्येही चर्चिला जात आहे, असे ते म्हणाले.

अलीकडील सर्व निवडणुका बेकायदा

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पूर्णपणे समझोता केला असून देशाची निवडणूक प्रणाली 'फिक्स' आहे. अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर आहेत, ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार करण्यात आला आहे. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा एक रणनीती म्हणून वापर करत आहे. बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, एसआयआर तत्काळ थांबवावा आणि वगळलेली १३ कोटी ३० लाख नावे पुन्हा समाविष्ट करावीत, अशा मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.

ज्ञानेश कुमार हे मोदी सरकारचे बाहुले

खर्गे म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मोदी सरकारचे बाहुले बनले आहेत. त्यांना तत्काळ हटवले पाहिजे. मोदी सरकारने आपल्या पूर्वजांनी उभारलेला मजबूत लोकशाहीचा पाया पद्धतशीरपणे कमकुवत केला आहे. तरुणांना मतदानापासून रोखण्याचा कट केला आहे. मोदींनी तरुणांना मतदानापासून रोखण्याचा कट रचला आहे. फॉर्म ६ शी संबंधित नियम बेकायदेशीरपणे बदलण्यात आले.

मोदी-शहांच्या राजीनाम्याची मागणी

हा अभूतपूर्व 'मत चोरीचा प्रकार' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याशिवाय संविधानाचे रक्षण होऊ शकत नाही, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने बडतर्फ करावे, एसआयआर प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, मतदारयाद्यांमधून वगळलेली १३ कोटींहून अधिक नावे पुन्हा समाविष्ट करावी, निवडणुकीत 'मॅच-फिक्सिंग' केल्याप्रकरणी मोदी यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in