नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल मोदी यांच्या हातात - राहुल गांधी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे, ते जे बटण दाबतात, तोच चॅनेल नितीश चालू करतात, अशी टीका लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे केली.
नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल मोदी यांच्या हातात - राहुल गांधी
Published on

नालंदा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे, ते जे बटण दाबतात, तोच चॅनेल नितीश चालू करतात, अशी टीका लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे केली.

अमेरिकेने १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या युद्धावेळी आपल्या नौदलाची सातवी तुकडी भारताकडे पाठवली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी निर्भयपणे सांगितले होते, आम्ही तुमच्या नौदलाला घाबरत नाही, आम्ही आमचे काम करू. इंदिरा गांधी या एक महिला होत्या, पण या मर्दापेक्षाही (मोदींपेक्षा) अधिक धाडस त्या महिलेत होते, राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट निशाणा साधाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवल्याचा दावा करत मोदींचा ५० वेळा अपमान केला. मात्र मोदी भित्रे आहेत, ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे म्हणण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. राहुल गांधी पुढे म्हणाले, आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले, सात विमाने पाडली होती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पण मोदी एकदाही म्हणाले नाही की, ट्रम्प खोटे बोलत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी बिहार सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, नितीश कुमार बिहार सरकार चालवत नाहीत; तर मोदी, अमित शहा आणि नागपूर (आरएसएस) चालवते. मोदीजींच्या हातात नितीशकुमार यांचे रिमोट आहे.

logo
marathi.freepressjournal.in