आसाममध्ये राडा; काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडले पोलिसांचे बॅरिकेड्स, न्याय यात्रा रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडला

या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पोलीस महासंचालकांना राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
आसाममध्ये राडा; काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडले पोलिसांचे बॅरिकेड्स, न्याय यात्रा रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूरमधून सुरु झालेली "भारत जोडो न्याय यात्रा" सध्या आसाममध्ये आहे. भाजपकडून या यात्रेवर आसाममध्ये दोन वेळा हल्ला केला गेल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. आता यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करत असताना मोठा राडा झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पोलीस महासंचालकांना राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले-

'भारत जोडो न्याय यात्रा' गुवाहाटी इथे असताना यात्रेला परवानगी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आसाम पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली. पोलिसांनी यात्रा अडवण्यासाठी मोठे बॅरिकेड्स लावले होते. यावेळी संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून शहरात प्रवेश केला.

यात्रेला शहरात परवानगी नाही-

राहुल गांधी यांच्या यात्रेला गुवाहाटी शहरात प्रवेश करण्याची परवानगी नसून त्यांना शहराच्या बाहेरून जाण्यास सांगितले होते. तरीही यात्रा शहराच्या दिशेने येत होती. यामुळे पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या बससोबत असलेले काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांशी भिडले. यानंतर त्यांनी बॅरिकेड्स तोडले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. तसेच, परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाला आहे.

दरम्यान, राहुल गांधी हे गुवाहाटी शहरात एक सभा घेणार होते. तसेच, ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. मात्र, त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधू दिला जात नसल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in