राहुल गांधी पोहचले सिद्धू मुसेवालाच्या घरी, गळाभेट घेत केले सांत्वन

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मुसा येथे पोहोचले.
राहुल गांधी पोहचले सिद्धू मुसेवालाच्या घरी, गळाभेट घेत केले सांत्वन
राहुल गांधी आणि सिद्धू मुसावालाचे वडील ANI

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musawala) यांच्या हत्येनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मुसा येथे पोहोचले. यादरम्यान राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्या पालकांची भेट घेतली. तसेच सिद्धू मुसेवाला यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सिद्धू मुसेवाला हे गायक तसेच काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. पंजाबमधील यंदाची विधानसभा निवडणूकही त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येच्या एक दिवस आधी सिद्धू मुसेवालासह पंजाब पोलिसांनी ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती.

सोमवारी काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही सिद्धू मुसेवाला यांच्या घरी पोहोचून त्यांच्या वडिलांची भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. भाजपच्या वतीने हंसराज हंस आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनी सिद्धूच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुसेवाला यांच्या शरीरात 19 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हत्येचा तपास करण्यासाठी पंजाब पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.

सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या घरी आई-वडिलांना भेटण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक नेत्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या पालकांचे सांत्वन केले आहे. आप सरकारचे अर्थमंत्री हरपाल चीमा आणि पंचायत मंत्री कुलदीप सिंह धालीवाल मुसेवाला यांच्या घरी पोहोचले होते.

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिलीANI

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in