प्रश्न विचारताच पत्रकारांवर भडकले राहुल गांधी; नेमकं काय घडले?

आज पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारताच भडकून दिले उत्तर
प्रश्न विचारताच पत्रकारांवर भडकले राहुल गांधी; नेमकं काय घडले?
@ANI

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष आणि गौतम अदाणींवर टीका केली. मात्र, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधी चांगलेच भडकले असून त्यांनी थेट पत्रकारांवर आरोप केले. ते म्हणाले, 'तुम्ही स्वतःला पत्रकार का म्हणवता?' असा सवाल केला.

राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना, 'न्यायालयाचा जो निर्णय आला, त्यावरुन तुम्ही ओबीसींचा अपमान केला, असा प्रचार तुमच्याविरोधात करत आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे?' असे विचारले. यावरून राहुल गांधी यांनी भडकून उत्तर दिले की, "आत्ताच पत्रकारांनी ३ वेळा यासंदर्भात प्रश्न विचारले. एवढ्या थेटपणे तुम्ही भाजपसाठी काम करता का? करत असाल तरी चर्चेद्वारे करा, जर तुम्हाला भाजपचे काम करायचे आहे, तर तसा भाजपचा टॅग छातीवर लावून फिरा. तेव्हा मी तुम्हाला आत्ता जसे उत्तर दिले, तसेच उत्तर देईन. आम्ही पत्रकार आहोत असे दाखवू नका." अशी टीका केली. त्यानंतर पत्रकाराला पुन्हा म्हणाले की, "काय झाले? सगळी हवा निघाली?"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in