CJP Protest Delhi : पेलेट गनचा वापर झाल्याचे राहुल गांधी यांनी दाखवले पुरावे; Video

२० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी झाडलेल्या पेलेट गनमुळे जखमी झालेल्या एका तरुण आंदोलकाला माध्यमांसमोर आणत राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
CJP Protest Delhi : पेलेट गनचा वापर झाल्याचे राहुल गांधी यांनी दाखवले पुरावे; Video
CJP Protest Delhi : पेलेट गनचा वापर झाल्याचे राहुल गांधी यांनी दाखवले पुरावे; Video(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी झाडलेल्या पेलेट गनमुळे जखमी झालेल्या एका तरुण आंदोलकाला माध्यमांसमोर आणत राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. दिल्ली पोलिसांनी अशी गन वापरल्याचा इन्कार केला आहे. मात्र ज्या धडक कृती दलावर (आरएएफ) हा आरोप आहे त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही गांधी यांनी केली. धर्मेंद्र प्रधान हे "गुन्हेगार शिक्षणमंत्री" असून ते देशातील कोलमडलेल्या शिक्षणव्यवस्थेचे प्रतीक बनले आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ या निवासस्थानाबाहेर आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत साहिल नावाचा जखमी आंदोलक उपस्थित होता.

राहुल गांधी म्हणाले, "सरकार म्हणत आहे की आंदोलकांवर पेलेट गनचा वापर झालेला नाही. पण हा गोळीबार कधी आणि कसा झाला, हे मी सांगू शकतो. माझा हा भाऊ हातात शांततेने तिरंगा घेऊन आंदोलन करत असताना त्याच्यावर बंदुकीतून छर्रे झाडण्यात आले.

जखमा दाखवल्या

राहुल गांधी यांनी त्या तरुणाचा टी-शर्ट वर करून त्याच्या अंगावरील जखमा उपस्थितांना दाखवल्या. साहिलच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला त्या डोळ्याने दिसणे बंद झाले आहे, असे राहुल गांधींनी सांगितले. ते म्हणाले, आपल्या देशाचे भविष्य असलेल्या हजारो तरुणांसोबत हे घडले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in