निवडणूक व्यवस्था मृत; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

भारताची अर्थव्यवस्था आधीच मृत झाली आहे, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. आता राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था आधीच मृत झाली आहे, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. आता राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. भारतातील निवडणूक व्यवस्था आधीच मृत झाली आहे. लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाला नसता, तर विद्यमान पंतप्रधान हे त्या पदावर बसूच शकले नसते, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

"१५ जागांवर हेराफेरी झाली नसती तर ते भारताचे पंतप्रधान होऊ शकले नसते. पण ७० ते ८० जागांवर घोटाळा झाल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे पंतप्रधान कमीच जागांनी त्या पदावर बसले निवडणूक आहेत. घोटाळ्याची आकडेवारी हादरून आम्ही जाहीर करू, तेव्हा व्यवस्था अक्षरशः जाईल. जणू अणूबॉम्ब फुटल्यासारखीच परिस्थिती ओढवेल," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर प्रहार केला.

राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित वार्षिक कायदेशीर परिषद- २०२५ मध्ये सांगितले की, "मी याआधीही म्हणालो आहे की, निवडणूक आयोगात मतांची चोरी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. जर तुमच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की ते वाचतील, तर हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही तुम्हाला सुटू देणार नाही."

मी 'राजा' या संकल्पनेच्या विरोधात - राहुल गांधी

राहुल गांधी जेव्हा या कार्यक्रमात व्यासपीठावर बोलण्यासाठी आले, तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरजोरात 'देश का राजा कैसा हो, राहुल गांधी जैसा हो' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. ही घोषणा ऐकताच राहुल गांधी यांनी घोषणा देणाऱ्यांना तत्काळ थांबवलं आणि शांतपणे त्यांना समजावून सांगितले. "मी राजा नाहीये आणि मला राजा बनायचेदेखील नाही. मी राजा या संकल्पनेच्या विरोधात आहे," असे राहुल गांधी म्हणाले.

निवडणूक आयोग हे मोदींच्या हातातील बाहुले – खर्गे

निवडणूक आयोग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील बाहुले बनले आहे. श्रावणसारख्या पवित्र महिन्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदींनी मौन व्रत धारण केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, "मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचे संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे तसेच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याचे कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तावेज नव्हे तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. ते प्रत्येक भारतीयाला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचा अधिकार देते. सध्या आपलेच संविधान धोक्यात आले आहे. जर भाजपने ४०० जागा जिंकल्या असत्या तर नक्कीच त्यांनी संविधान बदलले असते. पण 'अब की बार, ४०० पार' भाषा करणाऱ्यांना देशातील जनतेने सणसणीत चपराक लगावली आहे."

logo
marathi.freepressjournal.in