मोदी आणि शहांकडून महिला आरक्षणाबाबत देशाची दिशाभूल; राहुल गांधींचा घणाघात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी आणि शहांकडून महिला आरक्षणाबाबत देशाची दिशाभूल; राहुल गांधींचा घणाघात
मोदी आणि शहांकडून महिला आरक्षणाबाबत देशाची दिशाभूल; राहुल गांधींचा घणाघात
Published on

राणीपेट : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करून मोदी आणि शहा यांनी देशाशी खोटे बोलले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

तमिळनाडूतील राणीपेट येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी भाजपवर देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा आणि राज्यांना कमकुवत केला. शुक्रवारी लोकसभेत करण्याचा कट रचल्याचा दावा पराभूत झालेल्या घटनादुरुस्ती विधेयकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, शुक्रवारी संसदेत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला, हे तुम्ही पाहिले असेलच. त्यांनी देशाला सांगितले की ते महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी विधेयक आणत आहेत, परंतु त्यामागे एक 'असुरी विचार' लपलेला होता. राज्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपला प्रत्येक राज्याला मिळणाऱ्या जागांच्या संख्येत फेरफार करायचा आहे. त्यांना दक्षिण भारतीय राज्ये, ईशान्येकडील राज्ये आणि लहान राज्यांना कमकुवत करायचे आहे. भाजपने जे करण्याचा प्रयत्न केला, ते राष्ट्रविरोधी कृत्य होते आणि ते 'राज्यांच्या संघाच्या' विरोधात होते. मात्र, संपूर्ण विरोधी पक्षाने एकत्र येऊन त्यांचा हा डाव हाणून पाडला.

'आसाम आणि जम्मू-काश्मीर मॉडेल'ची भीती

भाजप सीमांकन प्रक्रियेचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करत असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी आधीच आसाम आणि जम्मू-काश्मीरचा निवडणूक नकाशा बदलला आहे आणि आता त्यांना उर्वरित देशातही तेच करायचे आहे. त्यांचा मुख्य उद्देश तुमची (तमिळ) संस्कृती, भाषा आणि परंपरेवर हल्ला करणे हा आहे, असा आरोप त्यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोदींवर नियंत्रण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करताना 'पंतप्रधान मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नियंत्रित करत आहेत,' असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी मोदींना राज्यात अण्णा द्रमुकची सत्ता हवी आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

सीमांकन विधेयकावर संसदेत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, 'काल तुम्ही संसदेत पाहिले असेल की मोदींचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. ते विरोधकांचा सामनाही करू शकत नव्हते आणि बाजूला झुकून बसले होते. याचे मुख्य कारण म्हणजे ते अमेरिकेच्या दबावाखाली आहेत. त्यांनी भारत-अमेरिका करारावर स्वाक्षरी करून देश विकला आहे.' ज्याप्रमाणे ट्रम्प मोदींना नियंत्रित करत आहेत, त्याचप्रमाणे मोदींना तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करायचे आहे, असा दावा राहुल यांनी केला.

एपस्टीन फाइल्सवरून गंभीर आरोप

राहुल गांधींनी आपल्या भाषणात अधिक आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, जर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना उडी मारण्यास सांगितले, तर मोदी उडी मारतात. जर त्यांनी झोपायला सांगितले, तर मोदी झोपतात. कारण ट्रम्प यांचे मोदींवर पूर्ण नियंत्रण आहे. हे नियंत्रण 'एपस्टीन फाइल्स 'च्या माध्यमातून मिळवले गेले आहे. ट्रम्प यांना मोदीची आर्थिक यंत्रणा आणि अदानीसोबतचे त्यांचे संबंध पूर्णपणे ठाऊक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in