टेलिग्राम बंदीवरून राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा; पेपर लीक माफियांवर कारवाई करा

केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
टेलिग्राम बंदीवरून राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा; पेपर लीक माफियांवर कारवाई करा
टेलिग्राम बंदीवरून राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा; पेपर लीक माफियांवर कारवाई करा(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची ही ‘नवीन युक्ती’ म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी किंवा चोराला पकडण्याऐवजी पीडिताच्याच घराला कुलूप लावण्यासारखी आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

नीट-यूजी २०२६च्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने ॲपवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी गुगलने आणि त्यानंतर ॲपलच्या ॲप स्टोअरनेही टेलिग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान का? राहुल गांधींचा सवाल

राहुल गांधी यांनी एक्सवर हिंदीत पोस्ट करत सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ‘टेलिग्राम बंदी’ ही पेपर लीक रोखण्यासाठी मोदी सरकारची नवी युक्ती आहे. म्हणजेच चोराला पकडण्याऐवजी पीडिताच्याच घराला कुलूप ठोकणे. देशातील लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे टेलिग्रामवर अभ्यास करत आहेत - तेथे त्यांना नोट्स मिळतात, टेस्ट सीरिज असतात, चर्चा आणि परीक्षेची तयारी चालते.

‘एनटीए’चे स्पष्टीकरण

२१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी पुनर्रचनेत गैरप्रकार आणि अफवा रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आल्याचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) म्हटले आहे. २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर लावण्यात आलेली ही बंदी परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी उचललेले पाऊल आहे.

logo
marathi.freepressjournal.in