आज राहुल गांधी शिक्षेविरुद्ध सुरत सत्र न्यायालयात करणार आवाहन याचिका

मोदी आडनावावरून झालेल्या बदनामीप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सुनावली होती २ वर्षांची शिक्षा
आज राहुल गांधी शिक्षेविरुद्ध सुरत सत्र न्यायालयात करणार आवाहन याचिका

काही दिवसांपूर्वी गुजरात सत्र न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. २०१९च्या निवडणुकीच्या भाषणामध्ये त्यांनी मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी ही शिक्षा झाली होती. यामुळे देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. या शिक्षणानंतर राहुल गांधींची खासदारकीदेखील रद्द करण्यात आली होती. आता न्यायालयाच्या या निर्णयाला राहुल गांधी सुरतच्या सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. यावेळी स्वत: राहुल गांधी तसेच गुजरात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे प्रमुख नेते सत्र न्यायालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ साली केलेल्या एका भाषणात मोदी आडनावाविषयी बदनामीकारक भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याविरेाधात सुरत येथील दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. २३ मार्च रोजी या खटल्याचा निकाल देताना मुख्य दंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी राहुल गांधी यांना भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. परिणामी कायद्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यानंतर काँग्रेससह विरेाधी पक्षांनी देशातील राजकारण ढवळून काढताना कोर्टाच्या या निर्णयासाठी सरकारला जबाबदार धरले होते. आता मात्र दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला काँग्रेस पक्ष गुजरातमधील सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in