तुम्ही भूतकाळ, भविष्याशी खेळू नका - राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे देशाचा भूतकाळ आहेत, त्यांनी भारताच्या भविष्याशी (जेन-झी) कसे वागावे याबद्दल सावध राहावे, असा थेट इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
तुम्ही भूतकाळ, भविष्याशी खेळू नका - राहुल गांधी
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे देशाचा भूतकाळ आहेत, त्यांनी भारताच्या भविष्याशी (जेन-झी) कसे वागावे याबद्दल सावध राहावे, असा थेट इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करणे आणि त्यांची सोशल मीडिया खाती बंद करण्यामागे मोदी आणि अमित शहा यांचाच हात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा- तुम्ही 'जेन-झी'ला घाबरवून शांत करू शकत नाही. आधी तुम्ही त्यांचे खच्चीकरण केले, आणि आता तुम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांची सोशल मीडिया खाती बंद करत आहात. तुम्ही भारताचा भूतकाळ आहात. भारताच्या भविष्याशी कसे वागायचे याबद्दल जरा सांभाळून राहा.

पंतप्रधानांचे वक्तव्य

राहुल गांधी यांची ही टीका मोदी यांच्या त्या वक्तव्यानंतर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते की पेपर फुटीच्या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर शिक्षण पद्धतीत व्यापक सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही टोळीला किंवा माफियाला सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी दिला होता. संसदेत पेपर फुटीविरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात मोदी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र आणि अनेक राज्य सरकारे पेपर फुटीच्या समस्येला तोंड देत आहेत. यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. म्हणूनच या समस्येशी लढा देण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करणे गरजेचे होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in