निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करणार, हिमंता बिस्व सरमा यांची माहिती

हिंसाचाराला फूस लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अटक करणार, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी बुधवारी दिली.
निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करणार, हिमंता बिस्व सरमा यांची माहिती

गुवाहाटी: हिंसाचाराला फूस लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अटक करणार, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी बुधवारी दिली.

आसाम पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर हिंसाचार केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बॅरीकेड तोडून यात्रा पुढे सरकवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले. आता त्याचा तपास होर्इल आणि लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जार्इल, असे सरमा यांनी सिबासागर जिल्ह्यातील नाझिरा येथे एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले. काही महिन्यातच देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. आसामचे पोलीस महासंचालक जी पी सिंग यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येणार आहे. सरमा यांनी महासंचालकांना राहुल गांधी यांच्यावर जमावाला भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. गुवाहाटी शहरात यात्रा प्रवेश करण्यासाठी या जमावाने पोलिसांशी झटपट केली होती. त्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कॉंग्रेसचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष भुपेन बोरा हे देखील तेथे उपस्थित होते. कॉंग्रेस नेत्यांवर आयपीसीच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात गुन्हेगारी कट रचणे, बेकायदेशीर जमाव, दंगल माजवणे, सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून बळजबरीने अटकाव करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी कलमांचा समावेश आहे.

मी घाबरणार नाही- राहुल गांधी

बारपेटा : राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपशासित आसाम राज्याच्या सरकारने आणखी शक्य तितके खटले दाखल करावेत तरीही आपण घाबरणार नाही. असे सांगत पुन्हा एकदा आसामच्या मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर शरसंधान केले.बारपेटा जिल्ह्यातील 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या सातव्या दिवशी आपल्या पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते. गुवाहाटी पोलिसांनी गर्दीला भडकावल्याबद्दल त्याच्या आणि इतर काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in