
लखनऊ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली, तर प्रियंका वढेरा या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. त्यांची इच्छा असल्यास त्या वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात, असे राय यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीव तोडून काम करेल. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या १३ रुपये किलोने साखर देणार होत्या, त्याचे काय झाले, असा सवाल राय यांनी केला. २०१९ च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीतून विजय मिळवला होता. त्यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अमेठी हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी निवडून गेल्या आहेत.