Video : "मी तुमचा आहे. तुमचा आवाज संसदेत..." विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा खास व्हिडिओ

जिथं सरकार संविधानावर आक्रमण करेल, तिथं मी पूर्ण ताकदीनं संविधानाची रक्षा करेन, असं राहुल गांधी म्हणाले.
Video : "मी तुमचा आहे. तुमचा आवाज संसदेत..." विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा खास व्हिडिओ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशात काँग्रेसला मागील दोन निवडणूकांच्या तुलनेत चांगलं यश मिळालं. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसनं ९९ जागा जिंकल्या. आज भाजप खासदार ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्याचवेळी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षनेते बनल्यानंतर राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत देशवासियांचे आभार मानले. मी तुमचाच आहे, तुमचा आवाज संसंदेत मांडेन, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी व्हिडिओत काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले की, "नमस्कार, देशाच्या जनतेचे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे, इंडिया आघाडीच्या सर्व नेत्याचे मी मनापासून आभार मानतो. मला कुणीतरी विचारलं की, माझ्यासाठी LOPचा (लीडर ऑफ अपोजिशन-विरोधी पक्षनेता) अर्थ काय? विरोधी पक्षनेतेपद तुमचा आवाज आहे, तुमचं अवजार आहे. जी तुमची भावना आहे, तुमच्या समस्या आहेत, त्या मी या माध्यमातून लोकसभेत मांडेन. हिंदुस्तानातील गरीब लोक, आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक, शेतकरी, कामगार...मी तुमचा आहे. संविधानानं आपली रक्षा होते. जिथं सरकार संविधानावर आक्रमण करेल, तिथं मी पूर्ण ताकदीनं संविधानाची रक्षा करेन. मी तुमचा आहे. तुमचा आवाज संसदेत मांडेन."

दहा वर्षानंतर लोकसभेला मिळाला विरोधी पक्षनेता-

२०१४ आणि २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान १० टक्के जागा जिंकता आल्या नव्हत्या. त्यामुळं या दोन्ही टर्ममध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद अस्तित्वात नव्हते. आता काँग्रेसनं ९९ जागा जिंकून लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवलं आहे. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो. राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यामुळं त्यांना विशेष अधिकार मिळणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in