राहुल गांधी यात्रा फिरलेल्या सर्व जागा जिंकू - हिमंता बिस्वा सरमा

आसाम पोलिसांनी राहुल गांधी व कॉँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
संग्रहित छायचित्र
संग्रहित छायचित्र

गुवाहाटी : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा जेथे जेथे फिरली त्या सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी व्यक्त केला.

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असतानाच आसाममध्ये यात्रा आणण्याचे काम हा येथे जातीय तणाव निर्माण करण्यासाठीचा राजकीय कट होता, अशी टीका देखील सरमा यांनी काँग्रेसच्या यात्रेवर केली. पण जेथे जेथे राहुल गांधी प्रचार करतील त्या सर्व जागा भाजप जिंकेल. त्या जिंकण्यासाठी राहुल गांधी आलेच पाहिजेत, असा टोमणा देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मारला. लोकसभा निवडणूक संपन्न होताच राहुल गांधींना अटक होर्इल. आसाम पोलिसांनी राहुल गांधी व कॉँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी पोलिसांनी लावलेले अडथळे तोडून गुवाहाटी शहरात प्रवेश केला. यात्रेसाठी घालून दिलेला मार्ग त्यांनी टाळला. प्राणप्रतिष्ठा सुरू असलेल्या दिवशीच राहुल गांधी यांनी अल्पसंख्याकबहुल वस्ती असलेल्या जिल्ह्यात यात्रा नेली. नायगाव व मोरीगाव या जिल्ह्यात जातीय दंगे भडकविण्याचा कट त्यांनी रचला, असा आरोप सरमा यांनी केला आहे. १८ जानेवारी रोजी ही यात्रा आसाम राज्यात शिरली होती. गुरुवारी ही यात्रा आसाममधून बंगाल राज्यात शिरली.

logo
marathi.freepressjournal.in