राहुल गांधींच्या भारत जोडोचे नाव आता ‘भारत जोडो न्याय यात्रा’

काँग्रेस खासदार राहुल गांधी आता दहा दिवसांनी (१४ जानेवारीपासून) भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहेत.
राहुल गांधींच्या भारत जोडोचे नाव आता ‘भारत जोडो न्याय यात्रा’

नवी दिल्ली : काँग्रेसने १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत न्याय यात्रेचे नाव बदलले असून आता या या मोहिमेला भारत जोडो न्याय यात्रा असे नाव असणार आहे. गुरुवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाने म्हटले आहे की, भारत जोडो यात्रा हे नाव आता एक ब्रँड बनले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते. या यात्रेची तयारी आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती यावर बैठकीत चर्चा झाली. खरगे यांनी डिसेंबरमध्ये फेरबदल केल्यानंतर पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक होती.

खरगे म्हणाले की, बैठकीतील विषय २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकणे आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीशी संबंधित आहे. दोघांचे यश आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्ही लोक पक्षाचे डोळे आणि कान आहात, असे खरगे म्हणाले. आता फक्त तीन महिने आहेत, ज्यामध्ये आम्हाला एक टीम म्हणून पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. यासोबतच त्यांनी पक्षश्रेष्ठींना आपसातील मतभेद मीडियात वाढवू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार निशाणा साधला. खरगे म्हणाले की, पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरला भेट दिली नाही, यावरून ते राष्ट्रीय प्रश्नांवर किती बेजबाबदारपणे वागतात हे दिसून येते.

भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून

काँग्रेस खासदार राहुल गांधी आता दहा दिवसांनी (१४ जानेवारीपासून) भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन २० मार्चला मुंबईत संपेल. लोकसभा निवडणुकीच्या सुमारे ४ महिने आधी निघणाऱ्या या यात्रेत १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांचा समावेश असेल. या काळात राहुल पायी आणि बसने ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक अंतर कापतील.

logo
marathi.freepressjournal.in