राहुल गांधींचा आवाज पुन्हा संसदेत गाजणार ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सदस्यत्व पुन्हा बहाल

यासंदर्भात आज(७ ऑगस्ट) बैठक पार पडून त्यात राहुल यांनी त्यांची खासदारकी परत देण्याची अधिसुचना जारी करण्यात आली आहे
राहुल गांधींचा आवाज पुन्हा संसदेत गाजणार ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सदस्यत्व पुन्हा बहाल
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभेच सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलं आहे. सुप्रिम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसकडून कोर्टाच्या निर्णयाची प्रत आणि न्य कागदपत्र तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. यासंदर्भात आज(७ ऑगस्ट) बैठक पार पडून त्यात राहुल यांनी त्यांची खासदारकी परत देण्याची अधिसुचना जारी करण्यात आली. राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाल्याने आता संसदेच्या सुरु असलेलेल्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होणात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर त्यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांना त्यांची खासदारकी परत मिळणार आहे. उद्या (८ ऑगस्ट) रोजी संसदेत केंद्र सरकार विरोधात दाखल केलेल्या अविश्वासावर चर्चा पार पडणार आहे. आता राहुल यांना या चर्चेत सहभागी होता येणार आहे. २०१४ नंतर मोदी सरकार विरोधातला हा पहिला अविश्वास ठराव आहे.

या अगोदर मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी भाषण संपल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना मिठी मारल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी मात्र मोदी सरकारविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा पार पडेल त्यावेळी राहुल गांधी नसणार, याबाबतची चर्चा सुरु होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आता राहुल यांना ती संधी उपलब्ध झाली आहे. आता राहुल या चर्चेत सहभागी होताता का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in