शिना बोरा हत्याप्रकरणी राहुल मुखर्जीचा नवा खुलासा, देवेन भारती यांचेही कनेक्शन

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी शीना हरविल्याची तक्रार दाखल न करण्याचा सल्ला दिला होता, असा धक्कादायक खुलासा केला
शिना बोरा हत्याप्रकरणी राहुल मुखर्जीचा नवा खुलासा, देवेन भारती यांचेही कनेक्शन
ANI

शीना बोरा हत्येप्रकरणी नव नवीन आणि धक्कादायक बाबी उघड होत असून या प्रकरणाला बेगळीच कलटणी मिळण्याची शक्यता आहे. या खटल्यातील साक्षीदार आणि शीनाचा बॉयफ्रेंड राहुल मुखर्जी यांनी सुरूवातीला आयपीएस अधिकारी परमबीर सिंग नावाचा स्फोट केल्यानंतर शुक्रवारी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचे नाव घेऊन मोठा धक्काच दिला आहे. देवेन भारती यांनीच शीना हरविल्याची तक्रार दाखल न करण्याचा सल्ला दिला होता, असा धक्कादायक जबाब शीनाचा बॉयफ्रेण्ड राहुल मुखर्जीने सीबीआय विशेष न्यायालयात नोंदवला आहे.

शीना बोराची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करण्यात आली होती. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय विशेष न्यायाधिश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीच्यावेळी राहुल मुखर्जीने २०१२ रोजी शीना हलविल्याची माहिती तात्कालीन आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना दिली गेली होती. शीना हरवल्याची माहिती आयपीएस अधिकारी यांना होती. सिंग हे माझ्या आईच्या मित्राचे मित्र आहेत. त्यांनीच मला शीना हरवल्याची तक्रार करायला सांगितली होती. त्यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले होते. तर आज आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी शीना हरविल्याची तक्रार दाखल न करण्याचा सल्ला दिला होता, असा धक्कादायक खुलासा केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in