राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; धारावी पुनर्विकासाबद्दल झाली चर्चा

शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेचे सदस्य आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी हा शेवाळे यांच्या मतदारसंघाचा भाग आहे.
राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट;
धारावी पुनर्विकासाबद्दल झाली चर्चा
PM

नवी दिल्ली : शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. 

 शेवाळे यांनी पत्नी कामिनी आणि स्वयम व वेदांत या दोन मुलांसह पंतप्रधानांची भेट घेतली. २० मिनिटांच्या बैठकीनंतर शेवाळे यांनी पत्रकारांना सांगितले की, धारावी पुनर्विकास प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मी पंतप्रधानांना दिले.

शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेचे सदस्य आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी हा शेवाळे यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. अदानी प्रॉपर्टीजने ५९४ एकर झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याची बोली जिंकली. या प्रकल्पातून २०००० कोटी रुपयांची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in