सत्यपाल मलिक यांच्या घरासह ३० ठिकाणी छापे; किरू जलविद्युत प्रकल्प अनियमितता प्रकरण

गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आपण रुग्णालयात दाखल झालो आहोत. असे असतानाही आपल्या निवासस्थानावर सरकारी यंत्रणांच्या हुकूमशहांनी छापा टाकला.
सत्यपाल मलिक यांच्या घरासह ३० ठिकाणी छापे; किरू जलविद्युत प्रकल्प अनियमितता प्रकरण

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेशातील एका जलविद्युत प्रकल्पाचे कंत्राट देताना झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संबंधित ठिकाणांसह अन्य ३० ठिकाणी छापे टाकले. किश्तवारमधील किरू जलविद्युत प्रकल्प या जवळपास २२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची कामे देताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आपण रुग्णालयात दाखल झालो आहोत. असे असतानाही आपल्या निवासस्थानावर सरकारी यंत्रणांच्या हुकूमशहांनी छापा टाकला. इतकेच नव्हे, तर आपला वाहनचालक आणि सहाय्यक यांच्यावरही छापे टाकण्यात आले आणि त्यांचा छळ करण्यात आला, असे मलिक यांनी एक्स या समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपण शेतकरीपुत्र आहोत, अशा प्रकारच्या छाप्यांना धूप घालत नाही, आपण शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत, असेही मलिक यांनी म्हटले आहे. मलिक हे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.

िनाब खोरे ऊर्जा प्रकल्प प्रा. लि. यांच्यामार्फत किरू जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठीच्या निविदा देताना त्यामध्ये अनियमितता झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून २९ जानेवारी २०२४ रोजी सीबीआयने दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील आठ ठिकाणी तपास केला होता.

या तपासामध्ये डिजिटल उपकरणे, संगणक आणि अन्य दस्तावेज यासह २१ लाखांहून अधिक रोकड जप्त केली होती. किरू जलिवद्युत प्रकल्पाचे काम देताना ई-निविदा प्रक्रियेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करण्यात आले नाही, असे सीबीआयने म्हटले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने दिल्ली, नोएडा, चंदिगड आणि सिमला येथील सहा ठिकाणी छापे टाकले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in