आता रेल्वे अधिकाऱ्यांचे काळे कोट जाणार : ब्रिटिश काळातील नावेही बदलणार

केंद्र सरकारने वसाहतवादाच्या खुणा आणि मानसिकता बदलण्याचे ठरविले असून त्यानुसार आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या अंगावरील बंद गळ्याचा काळा कोट जाणार आहे. हा पोशाख इंग्रजांच्या काळापासून वापरण्यात येत होता. रेल्वे मंत्रालयाने यात बदल करण्याचा निर्णय घेतला असून स्वदेशी पोशाख अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
आता रेल्वे अधिकाऱ्यांचे काळे कोट जाणार : ब्रिटिश काळातील नावेही बदलणार
आता रेल्वे अधिकाऱ्यांचे काळे कोट जाणार : ब्रिटिश काळातील नावेही बदलणारPhoto : X
Published on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने वसाहतवादाच्या खुणा आणि मानसिकता बदलण्याचे ठरविले असून त्यानुसार आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या अंगावरील बंद गळ्याचा काळा कोट जाणार आहे. हा पोशाख इंग्रजांच्या काळापासून वापरण्यात येत होता. रेल्वे मंत्रालयाने यात बदल करण्याचा निर्णय घेतला असून स्वदेशी पोशाख अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रेल्वे मंत्रालय रेल्वेच्या प्रभागांसह इतर ठिकाणांना ब्रिटिशांनी दिलेली नावे बदलणार असून आता त्यांना भारतीय नावे देण्यात येणार आहेत.

कौशल्यविकास

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात रेल्वेच्या नव्या निर्णयाबाबत विचार सुरू एका असल्याची माहिती दिली. त्यांनी वॉल्टेयर रेल्वे विभागाचे नाव विशाखापट्टणम रेल्वे प्रभाग झाले पाहिजे असे वक्तव्य केले. दरम्यान रेल्वे आता आपल्या कर्मचाऱ्यांना कौशल्य विकासासाठी लष्करासारखे प्रमोशन देणार आहे. आधी ज्या कामासाठी त्यांना निवडण्यात आले होते ते काम देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

नवे मापदंड

रेल्वे विभाग हा २०२४ पर्यंत विकसित भारतासाठी विकसित रेल्वे तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यासाठी नवे मापदंड ठरवले जाणार आहेत. यासाठी नवीन कल्पना राबवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे. नवीन कल्पनेसाठी पुढच्या वर्षी १२ नवे पुरस्कारही देण्यात येणार आहेत. यासाठी पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. यात भाग घेणाऱ्यांना आणि चांगली कल्पना पुढे आणणाऱ्यांना करोडो रूपयांचे पुरस्कारही दिले जाणार आहेत. त्यांची कल्पना चांगली असेल तर त्यांना चार वर्षे त्यावर काम करण्याची संधीही दिली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in