रेल्वे बोर्डाने दिली गुड न्यूज; असिस्टंट लोको पायलटपदाची बंपर भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाने आनंदाची बातमी दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी रेल्वे बोर्डाने ५ हजार ६९६ असिस्टंट लोको पायलटची पदे भरण्याची अधिसूचना जारी केली होती; मात्र विभागीय रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलटच्या अतिरिक्त पदांची मागणी केल्याने अखेर बोर्डाने सुधारित अधिसूचना जारी करून १८ हजार ७९९ असिस्टंट लोको पायलटच्या जागांना मंजुरी दिली आहे. या जागांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याने सरकारी नोकरीचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

रेल्वे बोर्डाने १५ डिसेंबर २०२३ आणि २ जानेवारी २०२४ रोजी अधिसूचना जारी करून ५ हजार ६९६ असिस्टंट लोको पायलटच्या पदांना मान्यता दिली होती. त्यानुसार रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डकडून ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र विभागीय रेल्वेनी असिस्टंट लोको पायलटच्या अतिरिक्त जागा भरण्याची मागणी केल्याने रेल्वे बोर्डाने नुकतीच सुधारित अधिसूचना जारी करून १८ हजार ७९९ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. ही पदे भरण्याबाबत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आठवडाभरात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डला दिले आहेत.

विभागीय रेल्वे सुधारित पदे

सेंट्रल रेल्वे १७८३

ईस्ट सेंट्रल रे ७६

ईस्ट कोस्ट रेल्वे १५९५

इस्टर्न रेल्वे १३८२

नॉर्थ सेंट्रल रे ८०२

नॉर्थ इस्टर्न रे १४३

नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे ४२८

नॉर्थर्न रे ४९९

नॉर्थ वेस्टर्न रेल्वे ७६१

साऊथ सेंट्रल रेल्वे १९४९

साऊथ इस्ट रेल्वे ३९७३

साऊथ इस्टर्न रेल्वे १००१

साउथर्न रेल्वे ७२६

साउथ वेस्टर्न रेल्वे १५७६

वेस्ट सेंट्रल रेल्वे ७२९

वेस्टर्न रेल्वे १३७६

एकूण १८,७९९

logo
marathi.freepressjournal.in