उत्तर भारतानंतर महाराष्ट्र, आता गुजरामध्ये पावसाचा हाहाकार ; अनेक ठिकाणी शिरलं पाणी

एक तरुण हातात गॅस सिलिंडर घेऊन रस्ता ओलांडत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने तो वाहून गेला
उत्तर भारतानंतर महाराष्ट्र, आता गुजरामध्ये पावसाचा हाहाकार ; अनेक ठिकाणी शिरलं पाणी

यंदा पाऊस जवळपास दीड महिना उशिराने दाखल झाला. यानंतर पावसाने उत्तर भारतातल्या उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा ही राज्य पाण्याखाली बुडवली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात सुरु असलेल्या मुसळधार पवासाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर पावसाने गुजरातला आपल्या रडारवर घेललं आहे. गुजरातमध्ये जारदार पाऊस सुरु असल्याने अहमदाबाद विमानतळ, हॉस्पिटल अशी अनेक ठिकाणे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या काही दिवसात देशात अतिवृष्टी होऊ लागली आहे. देशात यंदा पाऊस उशिराने दाखल झाला. यामुळे अनेक ठिकाणी हा पहिलाच पाऊस आहे. परंतु तो मोठ्या प्रमाणावर आल्याने जागोजागी पूर आले आहेत.

अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पुराचं पाणी घुसलं होतं. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गुजरातच्या अमरेली शहरात देखील पाणी घुसले आहे. एक तरुण हातात गॅस सिलिंडर घेऊन रस्ता ओलांडत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने तो वाहून गेला. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण सौराष्ट्रात पिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम दिसून येत आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये ब्रह्यपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात संततधार पावसामुळे तेथील पायाभूत सुविधांचं मोठ नुकसान झालं आहे. उत्तर प्रदेशातील हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखळ भागात पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in