हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला ; ८८ जणांचा मृत्यू, १६ जण बेपत्ता

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे. परंतु अद्याप बरेच काम करणे बाकी असल्याचं ते म्हणाले
हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला ; ८८ जणांचा मृत्यू, १६ जण बेपत्ता
Published on

हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतात सध्या पावसाने कहर केला आहे. भूस्खलन, वीजपुरवठा खंडित, अडवलेले रस्ते आमि खराब झालेल्या पुलांमुळे राज्यभर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात विविध भागात अजूनही अनेक पर्यटक अटकलेले आहे. अशात या महाप्रलयात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८८ वर पोहचली आहे. तर नैसर्गिक आपत्तीत ३ ते ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे ८८ जणांचा बळी गेला आहे. तर १६ जण बेपत्ता आहे. १०० जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. या आपत्तीत राज्यभरात ४९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

चंदीगड-मनाली, आणि शिमला-कालका महामार्गांसह १,३०० हुन अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. मनाली ते मंडी ही एकेरी वाहतूक काल रात्री उघडण्यात आली आणि रात्रभर १.००० हून अधित अडकलेल्या पर्यटकांची वाहने या मार्गावरुन गेली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे. परंतु अद्याप बरेच काम करणे बाकी असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर १५ जुलै पर्यंत राज्यभरातील शाळा बंद असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in