राजस्थानमध्ये भीषण अपघात; ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.
राजस्थानमध्ये भीषण अपघात; ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
Published on

जयपूर : राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पूर्वी (३), प्रियंका (२५), दक्ष (५), शीला, अंशु (२६), सीमा (२३), नैतीक (८), प्रियंका, रीता (२६), लक्ष्य (७), नीरज (२०) यांचा समावेश आहे. हा अपघात रात्री ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला असून सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

बैसई पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. यामध्ये प्रवाशांनी भरलेली गाडी उभ्या ट्रकला जाऊन धडकली.

logo
marathi.freepressjournal.in