नुकताच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. देशातील महत्वाचे समजल्या जाणाऱ्या राजस्थान या राज्यातील देखील मतमोजणीला सुरवात झाली आहे. राजस्थानमध्ये विरोधी पक्षात असेल्या भाजपने सुरवातीलाच मतमोजणीत काँग्रेसला धोबीबछाड देत कमबॅक केलं आहे. भारतीय जनता पक्ष बहुमतात सत्तेत परतताना दिसत आहे.
राजस्थानात आतापर्यंत पार पडलेल्या मतमोजणीत भाजप ११७ जागावर आघाडीवर आहे. तर राज्या माहितीनुसार काँग्रेस ६६ जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या टप्यात भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस हा सत्तेतून बाहेर फेकला गेल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे राजस्थानात शक्तीशाली असलेला काँग्रेस हा एवढ्या दारुण पराभवाच्या दिशेने का गेला याची चर्चा होताना दिसत आहे.
काय आहेत काँग्रेसच्या पिछाडीची कारणे?
विधानसभा निवडणूकांच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये गटबाी पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाता परिणाम हा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर देखील झाल्याचं दिसत आहे. याचा जनतेत चुकीचा संदेश गेला. निवडणुकीपूर्वी आम्ही एकत्र आहोत असा संदेश हे दोन्ही नेते देताना दिसले.परंतु तोपर्यंत फार उशिर झाला होता.
काँग्रेसच्या पिछाडीचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे. राजस्थानात मोदी विरुद्ध गेहलोत असा सामना होताना दिसला. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याने काँग्रेसच्या जात जनगणनेच्या मुद्याला देखील अयशस्वी ठरवलं. राजस्थना निवडणुकीचा सारा भार गेहलोत उचलताना दिसले तर मोदींनी राजस्थानात निवडणुक रॅली घेतल्या. राहुल गांधी राजस्थानात मोजक्या ठिकाणी प्रचारात उतरले. याचा पूर्ण फायदा हा भाजपाला झाला.