राजस्थानात मोठा दहशतवादी कट उधळला; स्फोटकांनी भरलेली पिकअप व्हॅन जप्त

फरीदाबाद मॉड्यूल आणि दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, राजस्थानमधील राजसमंद येथे एका पिकअप व्हॅनमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली असल्याने मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात आला आहे.
राजस्थानात मोठा दहशतवादी कट उधळला; स्फोटकांनी भरलेली पिकअप व्हॅन जप्त
राजस्थानात मोठा दहशतवादी कट उधळला; स्फोटकांनी भरलेली पिकअप व्हॅन जप्त
Published on

जयपूर : फरीदाबाद मॉड्यूल आणि दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, राजस्थानमधील राजसमंद येथे एका पिकअप व्हॅनमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली असल्याने मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात आला आहे.

राजस्थान पोलिसांनी राजसमंदमध्ये ही स्फोटके जप्त केली. ती राजस्थानमधील आमेड येथून नाथद्वारा येथे पिकअप व्हॅनमध्ये नेली जात होती. व्हॅनची झडती घेत असताना पोलिसांनी ही स्फोटके जप्त केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

राजसमंदमधील श्रीनाथजी पोलिसांनी एका पिकअप व्हॅनमधून स्फोटके जप्त केली. त्यानंतर संपूर्ण परिसरात पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पोलिसांच्या मते, पिकअप व्हॅनमधील स्फोटकांचा स्फोट झाला असता तर त्याचा १० किमीपर्यंतच्या परिसरात परिणाम झाला असता.

तथापि, ही स्फोटके कुठे नेली जात होती ते अद्याप कळलेले नाही. पोलीस पिकअप व्हॅनच्या चालकाची चौकशी करीत असून अनेकांची नावे समोर आली आहेत. त्या सर्वांचा कसून शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in