Rajput Karni Sena Chief Murder Video: करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडींची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली

यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नवीन सिंग शेखावत हा हल्लेखोर देखील ठार झाला आहे
Rajput Karni Sena Chief Murder Video: करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडींची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली

राष्ट्रीय राजपूर करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगर येथील घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काही अज्ञान बंदुकधारी व्यक्तींनी त्यांची हत्या केली. आज (मंगळवार ५ डिसेंबर) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गोगामेडी यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात शूटर सुखदेव सिंग आणि त्यांच्या साथीदारांसह बसले आहेत.

अचानक केला हल्ला

सुखदेव सिंह गोगामेडी हे त्यांच्या श्यामनगर येथील घरी शूटर यांच्यासह बसले असताना अचनाक त्यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. यावेळी पळून जात असताना हल्लेखोरांपैक एक असलेल्या नवीन सिंग शेखावत नावाच्या बंदूकधारी व्यक्तीचाही क्रॉस फायरिंगमध्ये मृत्यू झाला.

कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबादारी स्वीकारली

राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या झाल्यानंतर काही वेळात सध्या तुरुंगात असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य रोहित गोदारा याने सुखदेव सिंग यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोळ्या झाडल्यानंतर सुखदेव गोगामेडी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.

याबाबत जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, आज तीन जणांनी गोगामेडी यांच्या श्यामनगर येथील घरात गोळ्या झाडल्याचे प्रथमदर्शी दिसते. यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नवीन सिंग शेखावत हा हल्लेखोर देखील ठार झाला आहे. तसंच या हल्ल्यात गोगामेडी यांचा मित्र देखील गंभीर असून त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली आहे. ते पुढे म्हणाले की, पोलिसांकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असून घटनास्थळावरुन पळून गेगेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरु आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल.

श्री राजपूर करणी सेनेचे जयपूर जिल्हाध्यक्ष नारायण सिंह दिवराला म्हणाले, गोगामेडी यांना गेल्या वर्षभरापासून धमक्या येत होत्या. त्यांनी पोलिसांकडून अधिक सुरक्षा मागितली होती. आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा द्या, असं म्हणत त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं सांगितलं.

समर्थाकांकडून निदर्शने

सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी राजस्थानसह देशभर पसरली. यानंतर त्यांच्या समर्थकांकडून राज्यभरात निदर्शने सुरु आहेत. रविवार (३ डिसेंबर) रोजी राजस्थान विधानसभेच्या मतमोजणीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील ही सर्वात मोठी घटना घडली आहे. गोगामेडी यांच्या हत्येनंतर त्यांनी समर्थकांनी पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाचे आणि झाले जाळण्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in