वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर

देशाचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'चा अनादर करणे आता फौजदारी गुन्हा ठरणार आहे. या संदर्भातील बहुचर्चित विधेयक राज्यसभेत बुधवारी मंजूर करण्यात आले.
वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर
वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

नवी दिल्ली: देशाचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'चा अनादर करणे आता फौजदारी गुन्हा ठरणार आहे. या संदर्भातील बहुचर्चित विधेयक राज्यसभेत बुधवारी मंजूर करण्यात आले. नीट पेपर लीक प्रकरणातील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांच्या प्रचंड गदारोळात आणि आठवडाभरापासून चाललेला पेच संपवत संसदेचे कामकाज पार पडले.

दुपारच्या सत्रानंतर उपसभापती हरिवंश यांनी गदारोळातच सदस्यांना 'राष्ट्रीय मान अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६' वर बोलण्याची परवानगी दिली. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला.

हे विधेयक १९७१ च्या राष्ट्रीय मान अपमान प्रतिबंधक कायद्यात संशोधन करण्यासाठी आणले गेले आहे. याआधी या कायद्यात राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यांचा अवमान करणाऱ्या कृत्यांवर ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद होती, ज्यामध्ये आता राष्ट्रीय गीताचाही समावेश करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in