
शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली अकासा एअरलाईन्सचे जूनपासून उड्डाण सुरू होणार आहे. कंपनीने आपल्या पहिल्या विमानाचे फोटो प्रसिद्धीस दिले आहेत. आपल्या ‘क्यूपी-पाय’ला हाय करा, असे कंपनीने सांगितले.
झुनझुनवाला यांनी या विमान कंपनीत २६२ कोटी रुपये गुंतवले आहेत. अकासाचा विमान कंपनीचा कोड ‘क्यूपी’ आहे. जगातील प्रत्येक विमान कंपनीला डिझायनर कोड असतो. कंपनीने सांगितले की, बोईंग ७३७ मॅक्स विमान मिळाल्यानंतर जूनपासून विमान सेवेला सुरुवात करेल. ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानाची ऑर्डर दिली आहे. या विमानाला इंधन कमी लागते. मार्च २०२३ पर्यंत कंपनी आपल्या ताफ्यात १८ विमाने आणणार आहे. देशातील टायर-२ आणि टायर-३ शहरांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. तसेच महानगरांमध्येही