राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राकेश टिकैत
राकेश टिकैत एक्स
Published on: 

अलिगढ : शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राकेश टिकैत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यमुना द्रुतगती मार्गावरून पुढे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर टिकैत यांना टप्पल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राकेश टिकैत यांना केवळ ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही, असे पोलिसांच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

...तर आंदोलन तीव्र करू

या कारवाईबाबत राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलीस शेतकऱ्यांना आपापल्या घरात राहण्यास सांगून त्यांना गौतमबुद्धनगर, नोएडा आदी भागात जाण्यापासून रोखत आहेत.

q संमिश्र पानावर

logo
marathi.freepressjournal.in