प्रत्येक रामभक्त भाजपचा पाठीराखा असेलच असे नाही -शशी थरूर

भविष्यात ते अयोध्येला श्रीराम दर्शनाला जातील आणि कुणाची भावनाही दुखावणार नाहीत.
प्रत्येक रामभक्त भाजपचा पाठीराखा असेलच असे नाही -शशी थरूर
PM

तिरुवनंतपुरम : कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व खासदार शशी थरूर यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातून मिळालेल्या भरघोस पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर एक खोचक विधान केले आहे. प्रत्येक रामभक्त भाजपचा पाठीराखा नाही, असा दावा त्यांनी आपल्या विधानातून केला आहे. ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

थरूर हे तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे खासदार आहेत. ते पुढे म्हणाले की, माझ्यसह येथे अनेक रामभक्त आहेत. भविष्यात ते अयोध्येला श्रीराम दर्शनाला जातील आणि कुणाची भावनाही दुखावणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in