राम मंदिर देणग्या अपहार : पोलिसात तक्रार न करताच परतणाऱ्या चंपत राय यांना 'तो' फोन कुणाचा? ६ जुलैची बैठक ठरणार वादळी

अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे देणगी चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात जात होते. तेव्हा विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी चंपत राय यांचे फोनवर कोणाशी तरी बोलणे करून दिले. या संभाषणानंतर राय हे पोलिसात कोणतीही लेखी तक्रार न देताच परतले. त्यामुळे ‘तो’ फोन नेमका कुणाचा होता? याविषयी अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
राम मंदिर देणग्या अपहार : पोलिसात तक्रार न करताच परतणाऱ्या चंपत राय यांना 'तो' फोन कुणाचा? ६ जुलैची बैठक ठरणार वादळी
राम मंदिर देणग्या अपहार : पोलिसात तक्रार न करताच परतणाऱ्या चंपत राय यांना 'तो' फोन कुणाचा? ६ जुलैची बैठक ठरणार वादळी
Published on

विश्वजीत बॅनर्जी

अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे देणगी चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात जात होते. तेव्हा विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी चंपत राय यांचे फोनवर कोणाशी तरी बोलणे करून दिले. या संभाषणानंतर राय हे पोलिसात कोणतीही लेखी तक्रार न देताच परतले. त्यामुळे ‘तो’ फोन नेमका कुणाचा होता? याविषयी अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या अज्ञात कॉलरच्या ओळखीबाबत आणि गुन्हा दाखल न करण्याच्या कारणाबाबत गुप्तता पाळण्यात आल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.

राम मंदिर देणगीच्या चोरीचे खळबळजनक प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात २७ मे रोजीच चोरी उघडकीस येऊनही सुमारे १० दिवस हे प्रकरण का दाबून ठेवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जुलै रोजी होणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

५ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा रक्षकाने आणि मोजणी कर्मचाऱ्याने एका संशयिताला रोख रक्कम लपवताना पकडले होते. यानंतर लवकुश मिश्रा, मनीष यादव, करुणेश आणि रमाशंकर यांच्यासह सहा जणांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ट्रस्टने आपल्या प्रभावाचा वापर करून संशयितांकडून सुमारे ८० लाख रुपये वसूल केल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे.

परकीय चलन जप्त

अयोध्येतील राम मंदिरात मिळालेल्या देणग्यांच्या कथित अफरातफर प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी बुधवारी पुन्हा एकदा धाडी टाकल्या. या कारवाईत पोलिसांनी एक 'क्यूआर कोड' असलेली दानपेटी, रोख रक्कम, सोने, चांदी आणि परकीय चलन जप्त केले आहे. आरोपी लवकुश मिश्राच्या घरामध्ये साठवलेल्या वाळलेल्या चाऱ्याच्या ढिगाऱ्यांतही शोध घेतला. या प्रकरणी लवकुशचे वडील बच्चू लाल मिश्रा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in