

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील अफरातफरीच्या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका प्राथमिक शाळेचा शिक्षक, माजी कार मेकॅनिक, सेवानिवृत्त बँक कर्मचारी आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा विश्वासू सहकारी यांचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी प्रामुख्याने एका आऊटसोर्सिंग एजन्सीद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. त्यांनी मंदिराच्या देणगी व्यवस्थापन प्रणालीतील आपल्या पदाचा फायदा घेऊन काळांतराने रोख रकमा हडपल्याचा आरोप आहे. तपास पथक आता त्यांच्या आर्थिक व्यवहारांची, मालमत्तेची आणि या कथित कटातील त्यांच्या वैयक्तिक भूमिकेची तपासणी करत आहे.
आरोपींची पार्श्वभूमी आणि आरोप
यातील अविनाश शुक्ला हा प्राथमिक शिक्षक होता. देणगी मोजणी दरम्यान रोख रकमेच्या मेळ घालण्याचे काम त्याच्याकडे होते. त्याची घरे इत्यादी ठिकाणी २०
वीस हजार कोटींची लूट : खर्गे यांचा आरोप
चिक्कबल्लापूर : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर जमा झालेल्या देणग्यांमध्ये २०,००० कोटी रुपयांची 'लूट' झाल्याचा आरोप केला असून, त्यासाठी भाजप आणि आरएसएसला जबाबदार धरले आहे. खर्गे म्हणाले, "देवाच्या नावावर किती लूट होत आहे, हे तुम्ही पाहिलेच आहे. अयोध्येत काय झाले? गरीबांनी हे केले का? दलितांनी केले का? शेतकऱ्यांनी केले का? नाही. हे काम आरएसएस आणि भाजपशी संबंधित लोकांनी केले आहे. राम मंदिराच्या नावावर दान केलेले सोने, चांदी आणि विटांपर्यंतची लूट झाली आहे. ते दररोज देवाचे नाव घेतात, पण देवाच्याच नावावर ते लूट करतात," असा आरोप त्यांनी केला.
लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम, परकीय चलन आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत., सीसीटीव्हीचे 'ब्लाईंड स्पॉट्स' (जिथे सीसीटीव्ही कव्हरेज नाही) हेरून आणि शौचालयांमध्ये पैसे लपवून त्याने ही रक्कम लांबवली, अशी कबुली त्याने दिल्याचे सांगतात. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील एका योग केंद्रात राहत होता.
अनुकल्प मिश्रा हा कंत्राटी कामगार होता. त्याचे मासिक उत्पन्न सुमारे १५,००० रुपये होते. पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये ६५ लाख रुपयांचे घर, स्वतःच्या गावातील फार्महाऊस, एक प्रीमियम मोटारसायकल आणि एक बुक केलेली एसयूव्ही यांचा समावेश आहे, जी त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत जास्त असल्याचे पोलिसांना वाटते. लवकुश मिश्रा हा अनुकल्प मिश्राचा मेव्हणा असून तो पूर्वी कार मेकॅनिक म्हणून काम करायचा. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १४.२५ लाख रुपये जप्त केले आहेत.
विहिंपची पोलिसांकडे तक्रार
दरम्यान, राम मंदिरातील देणगीच्या कथित 'चोरी'बाबत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) अयोध्या पोलिसांकडे केली आहे. तसेच, या नेत्यांना त्यांचे आरोप सिद्ध करण्यासाठी बोलावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जर या नेत्यांनी "द्वेष, दुर्भावना आणि शत्रुत्व" पसरवण्याच्या उद्देशाने "आधारहीन आरोप" केल्याचे आढळल्यास, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
'ट्रस्ट'ची आज बैठक
'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ट्रस्टची सोमवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिलेल्या राजीनाम्यांवर मुख्यतः चर्चा होईल. ही बैठक ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्या 'मणी राम छावणी' या मठात होणार आहे. सूत्रांनुसार, ट्रस्ट चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या दोघांनीही आपल्यावर आरोप झाल्यानंतर राजीनामे दिले होते. याव्यतिरिक्त, अफरातफरीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या अंतरिम अहवालावर बैठकीत माहिती दिली जाईल आणि राम मंदिराच्या भविष्यातील व्यवस्थापन आराखड्यावर चर्चा केली जाईल.