अयोध्येतील राम मंदिर उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी; मंदिराचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटींवर

अयोध्या : अवघ्या वर्षभरापूर्वी उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराने वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत देशातील अनेक मंदिरांना मागे टाकल्याचे उघड झाले आहे. राम मंदिराचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटींवर गेले आहे.
अयोध्येतील राम मंदिर उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी; मंदिराचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटींवर
अयोध्येतील राम मंदिर उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी; मंदिराचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटींवरX - @ConquerTheMind_, @ImAkhilesh007
Published on

अयोध्या : अवघ्या वर्षभरापूर्वी उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराने वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत देशातील अनेक मंदिरांना मागे टाकल्याचे उघड झाले आहे. राम मंदिराचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटींवर गेले आहे.

अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घ्यायला देशाच्या विविध भागातून लाखो भाविक येत आहेत. रोज भाविकांच्या दर्शनाचा विक्रम होत आहे. यामुळे उत्पन्नाच्या बाबतीतही राम मंदिराचा क्रमांक तिसरा लागत आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत १३ कोटी पर्यटक व भाविक अयोध्येत आले आहेत.

मंदिराच्या उत्पन्नाने सुवर्ण मंदिर, वैष्णोदेवी, शिर्डीतील साई मंदिर यांना मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला अयोध्येचे मोठे योगदान आहे. रोज अयोध्येत दोन ते पाच लाख भाविक व पर्यटक येतात. या प्रचंड संख्येने येणाऱ्या पर्यटक व भाविकांची सोय करणे कठीण बनले आहे.

सध्या महाकुंभमध्ये पवित्र स्नान करून भाविक अयोध्येत येत आहेत. रोज चार लाख भाविक राम मंदिरात येत आहेत.

ट्रस्टच्या १० दान काऊंटरवर रोज १० लाख रुपयांपेक्षा जास्त दान येत आहे. महाकुंभच्या एका महिन्यात १५ कोटी रुपये दान म्हणून आले आहेत.

- प्रकाश गुप्ता, प्रभारी, मंदिर ट्रस्ट कार्यालय

प्रचंड निधीचे दान

राम मंदिरात येणारे भाविक मोठ्या निधीचे दान मंदिरात करत आहेत. तसेच सोने-चांदी दान करतात. एका अभ्यासानुसार, २०२४-२५ मध्ये आंध्र प्रदेशचे तिरुपती वेंकटेश्वर मंदिराचे वार्षिक दान १५०० ते १६५० कोटी, दुसऱ्या क्रमांकावर केरळच्या थिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभम स्वामी मंदिर आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ७५० ते ८५० कोटी आहे.

मंदिराचे नाव ठिकाण वार्षिक उत्पन्न

तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती १५००-१६५० कोटी

पद‌्मनाभ मंदिर केरळ ७५०-८०० कोटी

श्रीराम मंदिर अयोध्या ७०० कोटी

सुवर्ण मंदिर अमृतसर ६५० कोटी

वैष्णोदेवी कटरा ६०० कोटी

साई मंदिर शिर्डी ५०० कोटी

जगन्नाथ मंदिर पुरी ४०० कोटी

अक्षरधाम मंदिर नवी दिल्ली २०० ते २५० कोटी

सोमनाथ मंदिर गुजरात १५०-२०० कोटी

logo
marathi.freepressjournal.in