जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी; ४ जणांचा मृत्यू; अनेक बेपत्ता

जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या आणि ढगफुटीच्या घटना अनेक बेपत्ता घडत असल्याची माहिती समोर येत आहे. आता जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी झाली असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी; ४ जणांचा मृत्यू; अनेक बेपत्ता
Photo : X (@crpfindia)
Published on

रामबन/जम्मू : जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या आणि ढगफुटीच्या घटना अनेक बेपत्ता घडत असल्याची माहिती समोर येत आहे. आता जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी झाली असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

रामबनमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आणि ४ जण बेपत्ता झाले आहेत. या संदर्भातील माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या मते राजगड परिसरातील उंच भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाली. त्यामुळे अचानक पूर आला आणि त्यामध्ये काही घरे वाहून गेली. दरम्यान, या घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत. बाधित झालेल्या रहिवाशांना मदत करण्यासाठी बचाव आणि मदतकार्य स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in