पुद्दुचेरी : काँग्रेस सत्तेत असताना मागील अनेक वर्षांत काँग्रेसने देशाच्या विकासासाठी ठोस काही केले नाही. सत्तेत असताना काही काम न करता केवळ घोषणा केल्या. पोकळ घोषणा करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीला पराभूत करा असे आवाहन करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विकासकामात गावागावाचा आणि शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशासमोर सक्षम पर्याय आहेत, असे प्रतिपादन केले.
पुद्दुचेरीतील रॉयल पार्क सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत आठवले बोलत होते. यावेळी पुद्दुचेरी मतदारसंङातील भाजपचे लोकसभा उमेदवार नमो शिवयम यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा रामदास आठवले यांनी जाहीर केला. यावेळी रिपाइं चे पुदुचेरी चे प्रदेश अध्यक्ष ज्ञानमुर्ती, रिपाइंचे तामिळनाडूचे प्रदेश अध्यक्ष फादर एम. ए. सुसाई आदी उपस्थित होते. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदूचेरीत भाजप आणि रं गास्वामी काँग्रेस पक्षाची युती आहे.या युतीचे पुद्दुचेरीत सरकार असून त्यात रंगास्वामी काँग्रेसचे पाच आणि भाजप चे दोन मंत्री आहेत. त्यातील गृहमंत्री नमो शिवायम हे भाजपचे आमदार असून त्यांनाच भाजपने लोकसभा निवडणुकीत पुद्दुचेरीची उमेदवारी दिली आहे.