देशभरात रामलीला, बाइक रॅली, टॅटूच्या माध्यमातून आनंदोत्सव

देशभरात रामलीला, बाइक रॅली, टॅटूच्या माध्यमातून आनंदोत्सव

अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू आहे. तसेच देशातच नव्हे, तर जगभरातील लोक हा सोहळा साजरा करणार आहेत.

अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू आहे. तसेच देशातच नव्हे, तर जगभरातील लोक हा सोहळा साजरा करणार आहेत. आज, २२ जानेवारीला राम मंदिरात हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार असून सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीरामांच्या अयोध्यातील मंदिरामध्ये हा सोहळा होणार आहे. मंत्रोच्चाराने प्रभु श्रीरामाचे मंदिर व परिसर दुमदुमणार आहेत. अशा सोहळ्यामध्ये पद्मश्री पुरस्कृत सुदर्शन पटनायक व त्यांच्या सात विद्यार्थ्यांनी रामकथा पार्क, सरयु गेस्ट हाऊसजवळ, अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे वाळू शिल्प बनविले आहे. या वाळू शिल्पात अन्य ५०० छोट्या लहान मंदिराच्या प्रतिकृतीसुद्धा स्थापन केल्या आहेत. संपूर्ण विश्वात पहिल्यांदाच प्रभू श्रीरामाचे वाळू शिल्प बनवण्यात आले आहे. या वाळूशिल्पाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली असून, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर आणि फाऊंडर सुषमा नार्वेकर यांनी त्यांना सर्टिफिकेट आणि मेडल पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच हे रेकॉर्ड भारतीयांसाठी मानाचे स्थान आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in