काँग्रेसने काय केले त्याऐवजी बीआरएसने ेकाय केले ते राव यांनी जनतेला सांगावे - राहुल गांधी

आज तेलंगणात दोराला सरकार (सामंत सरकार) आणि प्रजला सरकार (लोकांचे सरकार) यांच्यात लढत आहे.
काँग्रेसने काय केले त्याऐवजी बीआरएसने ेकाय केले ते राव यांनी जनतेला सांगावे - राहुल गांधी
@ANI

आंदोळे (तेलंगणा) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसला सवाल करण्याऐवजी लोकांना त्यांनी काम काय केले आहे, ते सांगावे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना सांगितले.

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस सरकारने आपल्या कामांचा लेखाजोखा लोकांपुढे माडावा, वास्तविक हे सरकार देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, कॉंग्रेसने दिलेल्या ‘सहा हमी’ पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच कायद्यात बसवून तयार केल्या जातील, जर पक्ष राज्यात सत्तेवर आला आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.

आज तेलंगणात दोराला सरकार (सामंत सरकार) आणि प्रजला सरकार (लोकांचे सरकार) यांच्यात लढत आहे. काँग्रेसने काय केले असे तुमचे मुख्यमंत्री विचारत आहेत. काँग्रेसने काय केले हा प्रश्न नाही, तर केसीआरने काय केले, हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, तेलंगणातील बीआरएस आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पराभव करणे हे लक्ष्य आहे. राव ज्या हैदराबाद शहरातून कोट्यवधी रुपयांची लूट करत आहेत, ते काँग्रेसने विकसित केले आणि त्याचे आयटी हबमध्ये रूपांतर केले, असेही गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in